जिओनीने आणला चेहरा पाहून अनलॉक होणार नवा फोन

gioneee
नवी दिल्ली – मोबाइल सुरक्षेच्या दृष्टिने जिओनी कंपनीने आता नवा स्मार्टफोन बाजारात लॉंच केला असून ‘एस प्लस’ हा जिओनीचा नवा फोन असून यात फेस अनलॉक फिचर देण्यात आल्यामुळे फक्त युझरचा चेहरा समोर धरल्यावर हा फोन अनलॉक करता येईल.

या ड्यूल मायक्रो सिम असलेल्या ‘इलाइफ एस प्लस’ या फोनमध्ये ऍन्ड्रॉइड ५.१लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले असून ज्यावर कंपनीची अमीहो ३.१ यूझर इंटरफेस स्क्रिन आहे. या फोनमध्ये १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. तसेच यात ५.५ इंचाची एच डी सुपर ऐमोलेड स्क्रीन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन आहे. यामध्ये ऑक्टा – कोर मीडियाटेक प्रोसेसर आणि ३ जीबी रॅम आहे. तसेच मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज ६४ जीबीपर्यंत वाढविता येईल. जिओनीच्या नवीन फोनमध्ये १३ मेगापिक्सल प्रायमरी ऑटोफोकस कॅमरा आणि एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. त्यासोबतच ५ मेगापिक्सलचा फिक्स्ड फोकस फ्रंट कॅमेराही आहे. या नविन फोनची किंमत जिओनीने १६,९९९ रू. जाहीर केली असून लवकरच हा फोन बाजारात येणार आहे.

Leave a Comment