आसुसच्या ‘झेनफोन २ लेसर’ची विक्री सुरू

asus
नवी दिल्ली- ऑगस्ट महिन्यात आसुस मोबाईल कंपनीने लॉन्च केलेल्या ‘झेनफोन २ लेसर’ स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून करण्यात आली असून याची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे.

ऑगस्ट महिन्यातच कंपनीने ‘झेनफोन सेल्फी’, ‘झेनफोन २ लिसर’ आणि ‘झेनफोन २ डुलेक्स’ची प्री ऑर्डर बुकिंग सुरू केली होती. काळ्या, पांढ-या आणि लाल अशा तीन रंगामध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे.

लवकरच इतर रिटेल शॉपमध्ये देखील हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती कंपनीने हे स्मार्टफोन लॉन्च करतांना दिली होती.

Leave a Comment