राज्य सरकार देणार पतंजलीला आव्हान

patanjali
मुंबई : महाराष्ट्रात आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती करणा-या रामदेवबाबांच्या ‘पतंजली’ संस्थेला मोठया स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने सामान्य जनतेला स्वस्त व गुणकारी औषध मिळवून देण्यासाठी स्वतः आयुवेर्दिक औषधांच्या उत्पादन व विक्री व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारने वन धन जन धन या योजनेअंतर्गत नागपूरमध्ये पहिले आयुर्वेदिक औषधी भांडार सुरू केले आहे. या दुकानात तब्बल ४५ प्रकारची औषधे मिळतात. येत्या काळात राज्यातील प्रत्येक विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर अशी दुकाने सुरू करण्याचा विचार सरकारचा आहे. नुकत्याच राज्याच्या वन खात्याच्या झालेल्या बैठकीत रामदेव बाबांच्या आयुर्वेदिक उत्पादनांविषयी चर्चा करण्यात आली. रामदेव बाबा जंगलातून औषधी मिळवू शकतात तर सरकार का नाही? असा विचार त्यावेळी समोर आला. याला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही दुजोरा दिला आहे.

त्यांच्या मते आदिवासींना जंगलातील कोणत्या वनस्पती आणि वेलींचा औषध म्हणून कसा उपयोग होतो याविषयी पूर्ण माहिती असते. त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी तयार केलेली उत्पादनं विकण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्य म्हणजे असे केल्याने आदिवासींना रोजगार मिळेल आणि त्यांच्या औषधाने सर्वसामान्य जनतेला फायदा मिळणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment