डोमिनोज पिझ्झा डिलिव्हरीसाठी स्पेशल कार

dominos
ऐकायला कदाचित अजब वाटू शकेल पण बातमी खरी आहे. डोमिनोज या पिझ्झा कंपनीने ग्राहकांना गरमागरम पिझ्झा सर्व्ह करता यावा यासाठी स्पेशल कार खास स्वतःसाठी तयार करून घेतली आहे. डीएक्सपी म्हणजे डिलिव्हरी एक्स्पर्ट नावाने ही कार शेवरले स्पार्क २०१५ च्या मॉडेलवर आधारित आहे. ही खास हचबॅक प्रकारची कार आहे.

डोमिनोजने या कारमध्ये त्यांच्या सोयीसाठी कांही खास सुविधा करून घेतल्या आहेत. त्यात ग्राहकांना गरमागरम पिझ्झा देता यावा यासाठी चालकाच्या मागच्या बाजूस ओव्हनची सोय केली गेली आहे. या ओव्हनमध्ये ८० पिझ्झा मावतात आणि त्यामुळे ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत पिझ्झा गरमागरमही राहतो. कारच्या बाहेरच्या बाजूला छतावर आऊट फॉर डिलिव्हरी अशी चमकती खूण, फ्रंट साईडला डोमिनोजचा लोगो आहे. अमेरिकेत सुरवातीला २५ शहरांत डिलिव्हरीसाठी या कार वापरात आणल्या जात आहेत.