जीएसटीत तंबाखूजन्य पदार्थांवर अधिक भार मद्य,तंबाखूवर अतिरिक्त कर ?

gst
नवी दिल्ली : सिन टॅक्स (अनिष्ट कर) च्या रुपाने प्रस्तावित जीएसटी व्यवस्थेत मद्य आणि तंबाखूसारख्या शारीरिक हानी पोहोचवणा-या उत्पादनावर अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. या व्यवस्थेत देशभरात एक समान अप्रत्यक्ष कर पद्धती असेल, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

जीएसटीत मद्य आणि तंबाखूसारख्या उद्योगावर अतिरिक्त कर लावण्याची तरतूद केली आहे. परंतु ही टॅक्स व्यवस्था किती प्रमाणात असेल, याचे स्पष्टीकरण दिले गेले नाही. अनिष्ट कर (सिन टॅक्स) हा उत्पादन कर आहे. समाजाच्या दृष्टीने आणि आरोग्याचा विचार करता जी उत्पादने घातक आहेत, अशा वस्तूंवर हा अतिरिक्त कर लावला जातो. त्यामध्ये मद्य, सिगारेट, तंबाखू याचा समावेश आहे. अनिष्ट कर व्यवस्था जगभर लागू असून, ही व्यवस्था सर्वांना परिचित आहे. त्यामध्ये मद्य, तंबाखू या उत्पादनावर ज्यादा कर लावला जातो. अतिरिक्त कर लावण्यामागचा मूळ उद्देश शरीराला घातक असलेल्या उत्पादनाचे आकर्षण कमी व्हावे, असा आहे. याबरोबरच यातून अतिरिक्त महसूल मिळण्यासही मदत होते. अर्थात, अशा प्रकारच्या कराला जनतेचाही विरोध नसतो. खरे म्हणजे याचा जी मंडळी वापर करतात, त्यांनाच याचा फटका बसतो. केंद्रीय अर्थमंत्रालय सध्या जीएसटी लागू करण्याबाबत देशभरातील उद्योग आणि संस्था यांच्याशी सल्लामसलत केली जात आहे. प्रत्येक व्यक्तींशी सध्या संपर्क होत आहे. यातून एक धारणा स्पष्ट होईल, असा त्यांचा कयास आहे. यात जर कुठे उणीव भासली किंवा चिंतेचा विषय झाला, तर त्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल. सध्या कोणतीही भूमिका अंतिम नाही. कारण यासंबंधी बरेच प्रस्ताव समोर आले आहेत. त्यामुळे आम्ही आता त्यावर सूचनांची प्रतीक्षा करीत आहोत. यापुढे उद्योगाशी संबंधित सूचना पाहिल्या जातील आणि जीएसटी लागू करण्याअगोदर सूचनांच्या आधारावर आवश्यक ते बदल केले जातील आणि अंतिम अहवाल परिषदेसमोर ठेवला जाईल, असेही सांगण्यात आले.

Leave a Comment