‘बीकेसी’मध्ये ‘फेरारी’चे मुंबईतील पहिले शोरूम

ferrari
मुंबई: आलीशान गाड्यांच्या श्रेणीत आघाडीवर असलेल्या ‘फेरारी’चे मुंबईतील पहिले शोरूम बांद्र-कुर्ला काँप्लेक्समधील ‘प्लॅटीना’ या व्यावसायिक इमारतीत सुरू होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे शोरूम सुरू होणार आहे.

‘फेरारी’च्या नवनीत मोटर्स या वितरकांसाठी ‘वाधवा ग्रुप’ या आघाडीच्या विकासकांनी ३ हजार चौरस फुटांची जागा तळमजल्यावर उपलब्ध करून दिली आहे. ‘फेरारी’सारख्या नामवंत ब्रँडसाठी बांद्रा कुर्ला काँप्लेक्स ही अत्यंत सुयोग्य जागा असून मुंबईतील पहिल्या शोरूमसाठी आमच्या जागेची निवड फेरारीने केल्याबद्दल समाधान वाटते. हे व्यावसायिक संबध दीर्घकाळ टिकून राहतील; असा विश्वास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीन माखिजा यांनी व्यक्त केला.

या शोरूमच्या जागेसाठी ५ वर्षाचा भाडेकरार झाला असून दरमहा प्रतिचौरस फूट ४५० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

या जागेमुळे योग्य ग्राहक मिळणे आमच्यासाठी सुविधाजनक होईल; तसेच या ठिकाणी ग्राहकांना आवश्यक त्या सर्व सुविधा देणे शक्य होईल; असे नवनीत मोटर्सचे संचालक शरद कचालिया यांनी सांगितले.

Leave a Comment