मारुतीची नवी ‘सियाज आरएस’ बाजारात

maruti-ciaz
नवी दिल्ली – ऐन सनासुदीच्या तोंडावर मध्यम स्वरुपाची ‘सियाज आरएस’ ही नवी कार मारुती सुझुकी या कार उत्पादन कंपनीने बाजारात आणली आहे. या कारची किंमत ९.२ ते १०.२८ लाखापर्यंत असणार आहे.

‘सियाज आरएस’चे एकच मॉडल दोन प्रकारात उपलब्ध करण्यात आले आहे. एक पेट्रोल आणि दुसरी डिझलवर चालणारी आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या कारची किंमत बाजारात ९.२ लाख आहे. तर डिझेलवर चालणाऱ्या कारची किंमत १०.२८ लाखापर्यंत उपलब्ध आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

या नव्या कारचे उत्पादन दर्जेदार असून मध्यम स्वरुपाची असल्याने सर्वांना परवडणारी आहे. शिवाय तुमची प्रतिष्ठाही जपणारी आहे. ही कार ग्रे आणि स्पोर्टी काळ्या रंगात उपलब्ध आहे, असे मारुती सुझुकीचे भारतातील कार्यकारी संचालक आर.एस. कल्सी यांनी सांगितले. त्यांनी यावेळी कारच्या फिचर्सबद्दल माहिती दिली.

Leave a Comment