एअर आशियाची फेस्टिव्हल ऑफर

air-asia
नवी दिल्ली: किफायतशीर दरात विमान प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या ‘एअर एशिया इंडिया’ या विमान कंपनीने सणासुदीच्या निमित्ताने १ हजार ५९० रुपयात हवाई प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ही सुविधा २० ऑक्टोबर २०१५ ते २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत उपलब्ध असून त्यासाठी १ नोव्हेंबर २०१५ पर्यंत नोंदणी करता येणार आहे.
या योजनेंतर्गत बंगळुरू ते गोवा आणि बंगळुरू ते कोची या हवाई मार्गावर १ हजार ५९० रुपयात प्रवास करता येणार आहे. बंगळुरू ते पुणे या प्रवासासाठी १ हजार ९९० रुपयांचे तिकीट असून दिल्ली ते बंगळुरू हा प्रवास केवळ ४ हजार २९० रुपयात करता येणार आहे.

या शिवाय व्यवसायवृद्धीसाठी कंपनीने १ हजार २९९ रुपयांच्या तिकीटाची योजना जाहीर केली आहे. ही योजना १ मार्च ते २९ ऑक्टोबर २०१६ पर्यंत खुली राहणार आहे.

Leave a Comment