चार दिवस बँकांना सुट्टी

bank
मुंबई : गुरूवारपासून चार दिवस देशभरातल्या बँका बंद राहणार असून या आठवड्यात बँकांची कामे करण्याच्या तयारीत असाल तर ती पहिल्या तीन दिवसातच उरकून घ्या.

देशभरातल्या बँकांना येत्या गुरूवारी दसऱ्या निमित्त आणि त्यानंतर शुक्रवारी मोहरम निमित्त बँका बंद राहतील. बँकांना दुस-या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी लागू झाली आहे. त्यानुसार यंदा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. त्यानंतर रविवारी आहे.

रोखीचे आणि धनादेशाने होणारे कोट्यवधींचें व्यवहारही देशभरातल्या बँका बंद असल्याने ठप्प होणार आहे. आतापर्यंत सलग चार दिवस सुटी आल्यास रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करत असे. पण यंदा तसा कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

Leave a Comment