अवघ्या ७,९९९ रुपयांत मिळवा २४ इंचचा एलईडी टीव्ही

live
मुंबई: भारतात २४ इंच आणि ३२ इंचचे दोन बजेट एलईडी टिव्ही L!VE ने लॉन्च केले आहेत. याची किंमत क्रमश: ७,९९९ रुपये आणि ९,९९९ रुपये इतकी आहे. या रेंजमधील हे दोन मॉडल्समध्ये दुसऱ्या कंपनीच्या तुलनेत जास्त फीचर्स दिल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

दुसऱ्या महागड्या एलईडी सारखे काही खास फीचर्स या एलईडी टिव्हीमध्ये आहेत. यात हाय स्पीड यूएसबी, एचडीएमआय पोर्ट आणि एव्ही मोड खास आहे. सध्या ग्राहकांना चांगले फीचर्स असलेल्या टिव्हीसाठी खूप पैसे मोजावे लागतात आणि स्वस्त टिव्हीत चांगले फीचर्स नसतात. आम्ही कमी पैशात चांगले फीचर्स असलेला एलईडी टीव्ही देत असल्याचे कंपनीच्या मार्केटिंग वाइस प्रेसिडंट चेतन डिसूजा यांनी सांगितले. देशात फक्त खास रिटेलर्सद्वारे L!VE एलईडी टिव्ही खरेदी करता येणार आहे. कंपनी या टिव्हीसोबत एक वर्षाची वॉरंटी आणि सर्व्हिस देणार आहे.

2 thoughts on “अवघ्या ७,९९९ रुपयांत मिळवा २४ इंचचा एलईडी टीव्ही”

Leave a Comment