प्रथमच सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले म्हैसूरचे राजे

yaduveer
म्हैसूर- प्रथमच सुवर्ण सिंहासनावर वडियार घराण्याचे प्रमुख आणि म्हैसूरचे राजे महाराजा यदुवीर कृष्णदत्त चामराजा हे विराजमान झाले असून त्यांचा यावर्षी मे महिन्यात राज्याभिषेक झाला होता.

त्यानंतर ते प्रथमच सिंहासनावर बसले आहेत. ते सिंहासनावर दहा दिवसाच्या दसरा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विधीवत पूजेसह बसले. महाराजा यदुवीर यांनी वैदिक मंत्राच्या उद्घोषात सोनेरी सिंहासन ग्रहण केले. १० डिसेंबरला श्रीकांतदत्त वडियार यांचे निधन झाले होते. त्यांनी मृत्यूपूर्वी वारसाचे नाव जाहीर केले नव्हते. त्यानंतर सिंहासनावर तलवार ठेवली गेली. त्यांची पत्नी महाराणी प्रमोदा देवी यांनी यदुवीरला दत्तक घेतल्यानंतर यदुवीर हे म्हैसूर घराण्याचे राजे होणार हे निश्चित झाले होते.

Leave a Comment