तब्बल ६ जीबी रॅमचा स्मार्टफोन भारतात होणार लॉन्च !

LeTv
मुंबई : लवकरच एक स्मार्टफोन चीनमधील ऑनलाईन व्हिडीओ कंटेट सर्व्हिस कंपनी LeTV भारतात लॉन्च करण्याची शक्यता आहे. जो स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात येणार आहे त्यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर आणि तब्बल ६ जीबीचे रॅम असणार आहेत. जर LeTV कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केला, तर जगातील पहिला ६ जीबी रॅमचा स्मार्टफोन असेल.

यासोबतच ३६० डिग्री फिरणारा कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये असणार आहे. ज्याद्वारे युजर्सना स्मार्टफोनवरुन उत्तम सेल्फी घेता येणार आहे. या व्यतिरिक्त स्मार्टफोनची बॉडी पूर्णपणे मेटलने डिझाईन केलेली असेल.

मे महिन्यात चीनमध्ये LeTV कंपनीने LeTVOne, One Max स्मार्टफोन लॉन्च केले होते. आता लवकरच ही कंपनी स्मार्टफोनचे इंटरनॅशनल व्हर्जन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये गूगल आणि इतर अॅप्लिकेशन्सही सपोर्ट करु शकणार आहे. हा नवा स्मार्टफोन यंदा डिसेंबरपर्यंत बाजार येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment