‘बुलेट’ची पॅरिस आणि माद्रिद्रमध्ये शोरुम्स

bullet
नवी दिल्ली: ‘बुलेट’ या शानदार दुचाकी ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘रॉयल एन्फिल्ड’ने युरोपातील बाजारपेठेत व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने फ्रान्समध्ये पॅरिस आणि स्पेनमध्ये माद्रिद येथे विक्री केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्यम स्वरूपाच्या २५० ते ७०० सीसी क्षमतेच्या दुचाकीच्या जागतिक बाजारपेठेत आपले पाय रोवण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून या दोन शहरात रिटेल स्टोअर्स सुरू करण्यात आली आहेत. युरोपमधील फ्रान्स आणि स्पेनची बाजारपेठ आमच्यासाठी महत्वाची आहे; असे एन्फिल्डचे आंतराष्ट्रीय व्यवसाय प्रमुख अरुण गोपाल यांनी सांगितले.

फ्रान्समध्ये एन्फिल्डचे ८० ; तर स्पेनमध्ये २५ वितरक आहेत. फ्रासमध्ये कंपनीच्या व्यवसायात सन २०१५ च्या पहिल्या ७ महिन्यात ६० टक्क्याने आधा झाली असून या वर्षात आणखी ३ रिटेल स्टोअर्स सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे.

स्पेनमध्ये दुचाकीची बाजारपेठ २३ टक्क्यांनी वाढली असून त्यात एन्फिल्डला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सन २०१५ मध्ये आतापर्यंत कंपनीच्या विक्रीत तब्बल ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Leave a Comment