जगातील शक्तिशाली विमान ‘डिव्हाईन ईगल’

divine-egale
बीजिंग : जगातील सर्वांत शक्तिशाली विमान ‘डिव्हाईन ईगल’ ची निर्मिती चीन आणि रशियाने मिळून केली आहे. रडारच्या दृष्टीत न येणारे हे विमान अमेरिकेचे अदृश्य विमान स्टील्थलादेखील पाडण्यास सक्षम आहे.

द इंडिपेंडेंटच्या अहवालानुसार मे महिन्यात डिव्हाइन ईगलची छायाचित्रे समोर आली होती. तज्ज्ञांनी याला स्टील्थ विमानांचा शिकारी असे नाव दिले आहे. यामुळे हे अमेरिकेच्या हवाई दलाच्या सर्वोच्चतेसाठी आव्हान आहे. कारण स्टील्थच्या बळावरच ते या क्षेत्रात आघाडीवर आहे. डिव्हाईन ईगल एवढे विशाल आहे की यात स्टील्थ डड्ढोनला पकडण्यास सक्षम रडार- देखील ठेवले जाऊ शकते. हे विमान अत्याधिक उंचीवर उड्डाण भरू शकते. एका गुप्त अहवालानुसार या विमानाने अलीकडेच ५०० किलोमीटर अंतरावरील दक्षिण कोरियाच्या किना-यावरील असणा-या स्टील्थ एफ-२२ रॉफ्टरचा सिग्नल पकडला आहे. मागील २५ वर्षांपासून रशिया आणि चीन अत्याधुनिक रडार विकसित करीत आहेत. त्यांनी एक मेगाहर्टत्झ ते दोन मेगाहर्टत्झ लो बँडवाला व्हीएचएफ रडार तयार केला आहे, जो ढग-पावसाच्या आवाजापासून स्टील्थलादेखील पकडण्यास सक्षम आहे. डिव्हाईन ईगलमध्ये हाच रडार लावण्यात आला आहे. याशिवाय हे विमान चिपसारख्या मॉड्यूलने बनले आहे, जे अनेक प्रकारच्या रेडिओ वेव्हचे उत्सर्जन करतो.

अ‍ॅटिनाच्या समोर येत हे असे बीम निर्माण करतात, जे विशेष लक्ष्याला गाठू शकतात. व्हीएचएफ आणि हे बीम अदृश्य स्टील्थलादेखील दृष्टीसमोर आणून देतात. रशिया आणि चीनने स्टील्थच्या तंत्रज्ञानाला गांभीर्याने घेतले आणि या विमानाला पकडण्यास सक्षम रडार बनविणे सुरू केले. स्टील्थ कधीच पूर्णपणे अदृश्य विमान नव्हते, ते नेहमीच रडारच्या पकडीत येणारे सिग्नल निर्माण करायचे परंतु ते १०० मैलांच्या अंतराच्या जागी ते ५ मैलांच्या अंतरावर आल्यावरच रडारला दिसते. नाझींनी केला होता प्रारंभ सर्वांत आधी दुस-या महायुद्धा वेळी नाझींनी होर्टेन-२२९ विमान विकसित केले होते, जे रडारला चकविणारे पहिले विमान होते. आता काय करणार अमेरिका? अमेरिका या प्रकारचे स्टील्थ विमान निर्माण करू शकतो, जो निम्या वेव्हलेंथचे उत्सर्जन करेल आणि रडारच्या दृष्टीतून पुन्हा अदृश्य होऊ शकेल.

Leave a Comment