यशस्वीरीत्या कार्यान्वित झाला नासाचा क्यूबसॅट उपग्रह

cubesat
वॉशिंग्टन – अ‍ॅटलास पाच या अग्निबाणाच्या मदतीने व्हनडेनबर्ग हवाई दल तळावरून ऑक्टोबरमध्ये सोडलेला नासाचा क्यूबसॅट हा नॅनो उपग्रह कार्यान्वित झाला असून हा नॅनो उपग्रह उत्तम काम करीत असल्याचे नासाने म्हटले आहे.

नासा व द एरोस्पेस कार्पोरेशनचे एल सेगुंडो यांनी कॅलिफोर्नियात याबाबतची माहिती देताना द ऑप्टिकल कम्युनिकेशन अँड सेन्सर डेमनस्ट्रेशन (ओसीएसडी) क्यूबसॅट उपग्रह हा कक्षेत फिरत असून त्याने काम सुरू केल्याचे सांगितले. क्यूबसॅटचा वापर शैक्षणिक संशोधनाकरिता केला जाणार असून अवकाशीय खगोलांचा वेध व इतर तांत्रिक बाबींसाठी एक किफायतशीर यंत्रणा असावी, हा उद्देश त्यामागे आहे. त्यातून पृथ्वी निरीक्षणही साध्य होणार आहे. अवकाश तंत्रज्ञान मोहिमेचे सहायक प्रशासक स्टीव्ह जरझोक यांनी सांगितले, की ओसीएसडी सारख्या मोहिमा या तंत्रज्ञान प्रगतीत मोठे काम करू शकतात. अवकाशयानांची संदेशवहन क्षमता वाढवून त्यांना माहिती मि़ळवण्यात आणखी सक्षम केले जाऊ शकते व ओसीएसडी हा त्यासाठी चांगला पर्याय आहे. क्यूबसॅटमुळे विद्यार्थ्यांना उपग्रह विकास, संचालन व वापर याची प्रत्यक्ष माहिती मिळू शकते व प्रत्यक्ष माहितीच्या आधारे संशोधन करता येते.

Leave a Comment