
नवी दिल्ली : अॅपलचे आयफोन 6s आणि 6s प्लसची येत्या १६ ऑक्टोबरपासून विक्री सुरु करणार आहे, असे व्होडाफोन इंडियाने सांगितले असून व्होडाफोन आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सहा महिन्यांसाठी ८ हजार ८८५ रुपयांचा डेटा आणि व्हॉईस कॉल ऑफर देणार आहे.
आयफोन ६एस वर व्होडाफोन देणार ८ हजार ८८५ रुपयांची सूट
नवा आयफोन 6S किंवा आयफोन 6S प्लस जे ग्राहक खरेदी करतील, त्यांना १२९९ रुपयांचा प्लॅन फ्री दिला जाणार आहे. हा प्लॅन सहा महिन्यांसाठी असणार आहे, असे व्होडाफोन इंडियाकडून सांगण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये ३ जीबी मोबाईल इंटरनेट, ४ हजार फ्री लोकल-एसटीडी मिनटसोबत १५०० लोकल-एसटीडी मेसेजची ऑफर असणार आहे.
येत्या १६ ऑक्टोबरपासून भारतीय ग्राहकांसाठी आयफोन 6S किंवा 6S प्लस उपलब्ध होणार आहे. आयफोन 6S ची किंमत ६२ हजार रुपये, तर आयफोन 6S प्लसची किंमत ९२ हजार रुपये आहे.
