‘बॅंक ऑफ बडोदा’च्या दिल्लीतील शाखेवर सीबीआय, ईडीचा छापा

bob
नवी दिल्ली – सीबीआय आणि ईडी यांनी संयुक्तरित्या परकीय विनिमय कायदा भंग केल्याप्रकरणी उत्तर दिल्लीतील ‘बॅंक ऑफ बडोदा’च्या शाखेवर छापा टाकला असून या बॅंकेवर सुमारे सहा हजार कोटींपेक्षा जास्त गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

१ ऑगस्ट २०१४ ते १२ ऑगस्ट २०१५ या कालावधीत करण्यात आलेल्या चौकशीतून हा पैसा हाँग काँगकडे वळविण्यात आले असल्याचे निष्पण झाले आहे. सुमारे ८ हजार ६६७ इतके परकीय व्यवहार अशोक विहार शाखेतून झाले आहेत, हा व्यवहारच चौकशीला कारणीभूत ठरला आहे.

सहा हजार कोटी रुपयांचा काळा पैसा या राष्ट्रीयकृत बँकेतून देशाबाहेर गेल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. काजू आणि तांदूळ हस्तांतरणाच्या नावाखाली ही रक्कम हस्तांतरित करण्यात आली. मागील वर्षी हा प्रकार घडल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते आरपीएन सिंग यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार स्थापनेनंतर दोन महिन्यांनी हा प्रकार घडल्याचे सिंग म्हणाले. अशोक विहार भागातील बॅक ऑफ बडोदाच्या ५९ खात्यांमधून हा व्यवहार करण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितले. हाँगकाँग येथे ही रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याचे ते म्हणाले. दरम्यान सीबीआय आणि इडीने या आरोपानंतर बँक ऑफ बडोदावर छापा टाकला आहे.

Leave a Comment