आतापर्यंतचा सर्वात स्वस्त ३जी स्मार्टफोन लावाने केला लॉन्च

lava
फीचर फोन यूजर्सना लक्षात ठेवून लावाने फ्लेअर ई २ हा स्मार्टफोन लॉन्च केला असून फ्लेअर ई२ची भारतीय बाजारात किंमत अवघी २,९९९ रुपये आहे. लावाच्या ऑफिशिअल वेबसाइटवर हा फोन लिस्ट केला गेला आहे.

अँड्रॉइड सिस्टम ४.४ किटकॅटवर फ्लेअर ई २ स्मार्टफोन आधारित आहे. फोन ड्युअल सिम सपोर्टिव्ह आहे. प्रोसेसर बद्दल म्हटले तर फोनमध्ये १ GHzचे प्रोसेसर असेल. फ्लेअर ई २ स्मार्टफोनचा डिस्प्ले ३.५ इंचचा आहे. ज्याचे पिक्सेल रिझॉल्यूशन ४८०x३२० आहे.

फोनची रॅम थोडी कमी ठेवली आहे. रॅम २५६ एमबी आणि इंटरनल मेमरी ५१२एमबी दिली गेली आहे. एसडी कार्डद्वारे मेमरी १६ जीबीपर्यंत वाढवू शकता. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाले तर यात २ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे तर फ्रंट कॅमेरा व्हिजिए दिला गेला आहे. कॅमेऱ्यामध्ये पॅनोरामा मोड आणि कलर इफेक्ट सारखे मोड दिले गेले आहेत. फ्लेअर इ२ मध्ये १,४००mAhची बॅटरी आहे. हा फोन ब्लॅक आणि व्हाइट कलरमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment