दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वाढवणार सिगरेट, दारु, पेट्रोल, सोन्यावरील कर!

drink
मुंबई : दुष्काळ ग्रस्तांच्या मदतनिधीसाठी सिगरेट, विडी, दारु, पेट्रोल, डिझेलवरील कर वाढवला जाणार असल्याचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे धुम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांच्या तसेच वाहनचालकांच्या खिशाचा भार आणखी वाढणार आहे.

सिगरेट, विडी, दारुवर पाच टक्के अतिरिक्त कर मंत्रिमंडळाच्या झालेल्या निर्णयानुसार लावला जाणार आहे. तर पेट्रोल, डिझेलवर प्रतिलिटर दोन रुपये वाढवण्यात येणार असून याव्यतिरिक्त हिरे, सोनेच्या दागिन्यांवरील एक टक्का व्हॅट वाढून १.२०% केला जाणार आहे. यामधून सरकारला १६०० कोटींचा महसूल मिळणार असून पाच महिन्यांसाठी वाढ केली जाणार आहे.

Leave a Comment