पोर्न साईट शोधकार्यात भारतीय जगात पहिल्या पाचमध्ये !

porn
लंडन : जगातील सर्वांत मोठ्या पोर्नसाईटने केलेल्या सर्वेक्षणात पोर्न या शब्दाचा सर्च करणा-यांमध्ये भारताचा जगातील पहिल्या पाच क्रमांकात समावेश केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

नुकतेच पोर्नसाईटवर बंदी घातल्यानंतर भारतात खूप मोठा वाद उफाळला होता. भारतीय संस्कृती रक्षणार्थ पोर्नसाईटवर बंदी घालण्यात आल्याचा प्रचार करण्यात आला. तर दुसरीकडे अनेक नामवंतांनी बुद्धिवंतांनी या बंदीवर जोरदार टीकाही केली. त्याचवेळी यूजर्सच्या सर्वेक्षणात धक्कादायक बाब समोर आली. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडानंतर पोर्नसाईट पाहणा-यात भारताचा क्रमांक लागतो. भारतात इंटरनेट कनेक्टीव्हिटीच्या अनेक समस्या असतानाही यूजर्सकडून ७०० ते ८०० पोर्नसाईट नित्यनियमाने पाहिल्या जातात. याचा सरळ-सरळ अर्थ असा होतो की, इतर साईट्सच्या तुलनेत भारतीय पोर्नसाईट पाहण्यात अधिक धन्यता मानतात. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पोर्नसाईटवर भारतीय लोक सर्वाधिक जास्त काय सर्च करत असतील तर ‘वाईफ पोर्न’ . त्याहीपुढे गेले तर पोर्नसाईटवर सर्वाधिक सर्च केलेला शब्द आहे ‘वाईफ’. एकेकाळी खुली समाजव्यवस्था असलेल्या आपल्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात मॉरल पोलिसिंग झाले आहे की, लोकांच्या हाती इंटरनेटचे बाहुले आल्याने एकांतात लोकांना पोर्न पाहिल्याशिवाय चैनच पडत नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Leave a Comment