व्हायरसचा सर्वात मोठा अॅपल अॅपस्टोअरवर हल्ला

apple
बिजिंग : चीनमध्ये एका मोठ्या व्हायरसचा हल्ला अमेरिकेची कम्प्यूटर क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी अॅपलच्या अॅप स्टोरअरवर झाला आहे.

याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Xcode Ghost नावाचा दोष असलेले सॉफ्टवेअर चीनमध्ये आयफोन आणि आयपॅडच्या लोकप्रिय अॅप्लिकेशनमध्ये दिसून आले आहे. मात्र अॅपलच्या टीमने XcodeGhost या व्हायरसला हटवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले आहेत.

एका मोठ्या सायबर सिक्युरिटी फर्मने Xcode Ghost नावाचा मालवेअर असल्याची माहिती या आधी दिली होती. याआधी या फर्मच्या अॅपमध्ये हा व्हायरस शेकडोच्या संख्येत दिसून आला होता.

अॅपल अॅप स्टोअरवर झालेला हा व्हायरसचा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे, याचा रिपोर्ट देखील दाखल करण्यात आला आहे.