होंडाचे विक्रमी कार रिकॉल

honda
शुक्रवारी भारतीय कार बाजारात सर्वाधिक कार रिकॉलची घोषणा केली गेली असून अग्रणी कार उत्पादक कंपनी होंडाने त्यांच्या विविध मॉडेलच्या २ लाख २४ हजार कार रिकॉल केल्या आहेत. त्यात प्रिमियम स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल्स, हचबॅक मॉडेल्सचा समावेश आहे. यापूर्वी सर्वाधिक कार रिकॉल करण्याचे रेकॉर्ड जनरल मोटर्सच्या नावावर होते. त्यांनी याच वर्षात १ लाख ५५ हजार कार रिकॉल केल्या होत्या.

होंडाने डिफेक्टीव्ह एअरबॅग्ज च्या कारणाने रिकॉल केले असल्याचे सांगितले जात आहे. रिकॉल १२ आक्टोबरपासून सुरू होणार असून कारमालकांना त्यांच्या कारची कंपनीच्या सर्व्हीस स्टेशनवर मोफत दुरूस्ती करून दिली जाणार आहे. रिकॉल करण्यात आलेल्या कारमध्ये सीआरव्ही, सिव्हीक, सिटी, जॅझ या मॉडेल्सचा समावेश आहे. भारतात आत्तापर्यंत विविध कंपन्यांकडून रिकॉल करण्यात आलेल्या कारची संख्या १० लाख ८६ हजार कारवर गेली आहे.

यापूर्वी २०१३ सालात फोर्डने त्यांच्या फिगो व फिएस्टा मॉडेल्सच्या १ लाख ६६ हजार कार रिकॉल करून विक्रम नोंदविला होता.

1 thought on “होंडाचे विक्रमी कार रिकॉल”

Leave a Comment