
टाटा मोटर्सच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हरने त्यांच्या जेम्सबॉण्डच्या आगामी स्पेक्टर चित्रपटात वापरल्या गेलेल्या गाड्या फ्रॅकफर्ट येथे सुरू असलेल्या ००७ ग्लोबल रिलीज शोमध्ये सादर केल्या आहेत. हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. जग्वार सीएक्स ७५, रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्हीआर आणि लँड रोव्हर डिफेंडर या गाड्या या शोमध्ये सादर केल्या गेल्या.
जग्वार जेम्स बॉण्ड स्पेक्टरच्या कार सादर
या कार्यक्रमाच्या वेळी स्पेक्टरमध्ये खलनायकाच्या भूमिकेत असलेला डेव्हीड बॉटिक्टा आणि २०१२ मध्ये स्कायफॉलमध्ये प्रथम दिसलेली व स्पेक्टरमध्येही मिस मनीपेनीची भूमिका साकारत असलेली निओनी हॅरिस उपस्थित होते. या कार चित्रपटात रोमच्या रस्त्यांवरून थरारक पाठलाग करताना दिसणार आहेत. बॉटिक्टा यावेळी बोलताना म्हणाला की या गाड्या चालविण्याचा अनुभव अतिशय रोमांचकारी होता आणि या गाड्या चालविण्याचे माझे स्वप्न त्यामुळे पुरे झाले आहे.
