मायक्रोमॅक्सचा ‘यू यूनिक’ अवघ्या ९ सेकंदात सोल्ड आऊट!

micromax
मुंबई : मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीचा ‘यू यूनिक’ या स्मार्टफोनची स्नॅपडीलवर विक्री सुरु करण्यात आल्यानंतर अवघ्या ९ सेकंदात सर्व यूनिट्स सोल्ड आऊट झाले. मायक्रोमॅक्सच्या यू यूनिकची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे.

मायक्रोमॅक्स किंवा स्नॅपडीलकडून विक्रीसाठी किती स्टॉक ठेवले होते, याबाबत माहिती मिळाली नाही. ज्यांनी या स्मार्टफोनची आधीपासूनच नोंदणी करुन ठेवली होती, अशा ग्राहकांनाच हा स्मार्टफोन खरेदी करता आला. आता पुढील सेलची नोंदणीही सुरु झाली आहे. ४जी सर्व्हिसाठी यू यूनिकने एअरटेलशी करार केला असून त्यानंतर ग्राहकांना एअरटेल ४जी सिमवर ६ महिन्यांसाठी मोफत डेटा उपलब्ध होऊ शकेल.

Leave a Comment