शिक्षणावरही होतो वायू प्रदूषणाचा परिणाम; अमेरिकी आरोग्यतज्ज्ञांचे मत

pollution
वॉशिंग्टन : माणसाच्या आरोग्यावर वायू प्रदूषणाचा परिणाम होत असतो. पण जी मुले सातत्याने वायू प्रदूषणाच्या संपर्कात येतात ती नेहमीच आजारी राहतात, परिणामी त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावरही होतो, असे मत अमेरिकी आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टेक्सासमधील काही शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यास या आरोग्यतज्ज्ञांनी केला. ज्या मुलांची घरे रस्त्याजवळ आहेत, ज्यांचा संपर्क सातत्याने वाहनातून उत्सर्जित होणा-या वायूशी येतो, अशा मुलांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. शालेय परीक्षेत चांगले गुण मिळविणा-या अनेक विद्यार्थ्यांना प्रदूषणाचा फटका बसला आहे. प्रदूषणामुळे सातत्याने आजारी पडल्याने त्यांच्या गुणांवरही परिणाम झाला, असे या आरोग्यतज्ज्ञांना दिसले. विषारी वायू प्रदूषके सोडणा-या परिसरात राहणा-या मुलांना नेहमीच कमी गुण मिळत असल्याचेही दिसून आले. शाळेतील शैक्षणिक प्रगती व प्रभावही त्यांचा कमी असल्याचे दिसते, असे सारा ई. ग्रिनेस्की यांनी सांगितले. टेक्सास विद्यापीठात सहायक प्राध्यापक असलेल्या ग्रिनेस्की यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यतज्ज्ञांनी शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंदर्भात अहवाल तयार केला आहे. आरोग्यतज्ज्ञांनी हा आढावा घेताना विविध शाळांतील १,८९५ विद्यार्थ्यांशी व त्यांच्या पालकांशी चर्चा केली.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment