स्वस्त झाले विनाअनुदानित सिलेंडर

lpg
नवी दिल्ली : सर्वसामान्यांना पेट्रोल, डिझेलच्या दरकपातीनंतर आणखी एक खूशखबर असून २५ रुपये ५० पैशांची विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात कपात झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

त्याचबरोबर जेट विमानाच्या इंधन दरातही ११.७० टक्के कपात झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कालच कपात झाली होती. पेट्रोल २ रुपये आणि डिझेल ५० पैशांनी स्वस्त झाल्यानंतर आता विनाअनुदानित सिलेंडरदरात २५.५० रुपयांची कपात झाली आहे.

Leave a Comment