व्याजदर कपातीचे राजन यांनी दिले संकेत

rajan
वॉशिंग्टन – चीनमधील आर्थिक संकट आणि चलनफुगवट्याचा दर लक्षात घेता रिझर्व्ह बँक अजूनही समायोजनाच्या टप्प्यात आहे आणि चलनफुगवटा व अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारीचा विचार केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे सांगून आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी पतधोरणाचा आढावा घेताना व्याजदर कपातीचे संकेत दिले.

आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेत जो चलनफुगवटा आहे तो इतर अर्थव्यवस्थांमध्ये नाही. आम्ही यावर्षी तीन वेळा व्याजदरात कपात केली आहे आणि अजूनही आम्ही ताळमेळ बसविण्याच्या टप्प्यात आहोत. येणार्‍या आकडेवारीवर आमची नजर असेल आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ, असे राजन यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. दर निश्‍चित करण्यासाठी पतधोरण समिती स्थापन करण्याच्या मुद्यावर आरबीआय आणि सरकारमध्ये एकमत झाले आहे आणि लवकरच याची घोषणा केली जाईल, असे कांसास सिटी फेडरल रिझर्व्हच्या जॅक्सन हॉलमध्ये आयोजित आर्थिक परिसंवादात भाग घेण्यासाठी आलेल्या राजन यांनी सांगितले.

राजन यांनी जे बहुचर्चित दस्तावेज सादर केले होते ज्यामध्ये २००७-०८ साली जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे भाकीत करण्यात आले होते, ही तीच समिती आहे. तेव्हा राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ होते. व्याजदरात कपात करण्याबाबत सरकार आणि उद्योगजगताकडून राजन यांच्यावर सातत्याने दडपण येत आहे, हे याठिकाणी उल्लेखनीय.

Leave a Comment