
हौस्टोन – सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने एक नवीन विक्रम रचला असून एका दिवसात फेसबुकवर जगभरातून तब्बल १ कोटी युजर्सने भेट दिली आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक वॉलवर सोशल कनेक्टीव्हिटीमधील या चमत्कारीक यशाने आम्ही मैलाचा दगड गाठल्याचे पोस्ट करुन म्हटले आहे.
फेसबुकचा नवा विक्रम, जगभरातून एका दिवसात १ कोटी युजर्सने दिली भेट
कॅलिफोर्निया येथील सोशल नेटवर्कींगशी संबंधीत साईटने याबाबत माहिती दिली असून तसेच जगभरात प्रत्येक ७ व्यक्तींमागे १ जण फेसबुक वापरत असल्याचे या संशोधन साईटने म्हटल्याचे मार्क यांनी म्हटले आहे. सध्याच्या डीजीटल युगात प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्याचा, माहिती देण्याचा आणि नवनवीन संधी शोधण्याचा मार्ग आम्ही फेसबुकच्या माध्यमातून उपलब्ध करुन देत असल्याचेही झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.
