फरारीने लॉन्च केली ‘कॅलिफोर्निया टी’

ferarri
नवी दिल्ली – आपली नवीन स्पोर्टस कार ‘कॅलिफोर्निया टी’ ही फरारीने लॉन्च केली असून इतर स्पोर्ट कार्सच्या तुलनेत या कारमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी कारप्रेमींसाठी सामाविष्ट करण्यात आल्या आहेत. कॅलिफोर्निया टी’मध्ये व्ही८ हे इंजिन आहे. या कारमध्ये ३ हजार ८५५ सीसी आणि ८ सिलेंडरच्यामध्ये टर्बोचार्ज इंजिन असल्यामुळे ३१५ किलोमीटर एक तासामध्ये ही कार पार करते, असा कंपनीचा दावा आहे.

या कंपनीचे पहिले मॉडेल १९५० मध्ये लॉन्च झाले होते आणि आता कंपनीने आपल्या जुन्या मॉडेलला नवा लूक देऊन ‘कॅलिफोर्निया टी’ या नावाने लॉन्च केली आहे. फरारी कंपनीच्या पश्चिम आशियाचे सेल्स हेड आरेलियन सोवार्ड यांच्या मते, भारतात आतापर्यंत या कारला ८ बुकिंग मिळाल्या असून त्यांना अजून २० कारची बुकिंग होण्याचा अंदाज आहे. या कारची किंमत ३.४ करोड रुपये आहे. सध्या भारतात मुंबई आणि दिल्ली या दोनच शहरांमध्ये फरारी कंपनीचे दोन डिलर आहेत. मुंबईत ‘नवनीत मोटर्स’ला डीलरशीप देण्यात आली असून ऑक्टोबरपर्यंत कुर्ल्यामध्ये नवीनीत मोटर्स शोरुम सुरु करणार असल्याची माहिती मिळते आहे.

Leave a Comment