
मुंबई : ४जी कनेक्टिव्हिटी असलेला नवा स्मार्टफोन इंटेक्स या भारतीय स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केला आहे. या नव्या स्मार्टफोनचे नाव ‘अॅक्वा टर्बो ४जी’असे असून याची किंमत ७ हजार ४४४ रुपये आहे. रिटेल आणि ऑनलाइन स्टोअरवर हा हँडसेट उपलब्ध करण्यात आला आहे.
इंटेक्सने आणला ४जी कनेक्टिव्हिटीवाला ‘अॅक्वा टर्बो ४जी’
आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या या नव्या स्मार्टफोनमध्ये ४जी LTE कनेक्टिव्हिटीसोबत ३००० mAh क्षमतेची बॅटरी असून ५ इंचाचा एचडी डिस्प्ले असून ७२०x१२८० एवढे पिक्सेल रिझॉल्युशन आहे. त्याचप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सल रेअर आणि २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ५.० लॉलिपॉप असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये १GHzचा क्वाडकोर मीडियाटेक एमटी६७३५ प्रोसेसर दिला आहे. तसेच १जीबी रॅमसोबत ८ जीबीची इंटरनल मेमरी असून ३२जीबी पर्यंत एसडी कार्ड वाढवताही येणार आहे.
