तंबाखू सेवनामुळे जगात दरवर्षी दहा लाख लोकांचा बळी; सर्वाधिक प्रमाण भारतात

tobacco
लंडन : जगात दरवर्षी अडीच लाखपेक्षा जास्त व्यक्तीचा मृत्यू धुररहित तंबाखूच्या सेवनमुळे होतो आणि त्यातही तीन चतुर्थांश मृत्यू भारतात होतात. तंबाखू सेवनाच्या जागतिक प्रभावाचे आकलन करणा-या एक सर्वेक्षणातून हा खुलासा झाला.

या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार तंबाखू आधारित उत्पादनाच्या सेवनाने होणा-या आजारामुळे दरवर्षी दहा लाख लोक काळ्याच्या पडद्याआड जातात. या तंबाखू सेवनामुळे होणा-या मृत्यूमध्ये ८५ टक्के मृत्यू हे दक्षिण-पूर्व अशियामध्ये होतात. आणि त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे ७४ टक्के मृत्यू हे फक्त भारतात होतात. दक्षिण-पूर्व अशियामध्ये पाच टक्के मृत्यूसह बांगला देश दुस-या नंबरवर आहे.

हे सर्वेक्षण जगातील ११३ देशामध्ये करण्यात आले. आणि यासाठी २०१० जागतिक रोग अध्ययन तसेच ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्वेक्षणातील माहितीचा आधार घेण्यात आला. २०१० मध्ये झालेल्या अभ्यासामध्ये तंबाखूच्या सेवनाने तोंड, श्वासनली आणि घेंघाच्या कॅन्सरमुळे ६२ हजारपेक्षा आधिक लोकांचा मृत्यू झाला होता तसेच हृदय आजारामुळे २ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. इंग्लंडमधील यार्क यूनिवर्सिटीचे विज्ञानाचे वरिष्ठ प्राध्यापक कामरान सिद्दीकी म्हणाले की, या आकडेवारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण भविष्यामध्ये हा आलेख कमी होणार नसून वाढतच जाणार आहे. त्यामुळे धुररहित तंबाखूच्या उपयोगावर नियंत्रण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होण्याची करण्याची गरज आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment