इस्त्रोच्या जीसॅट-६ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

gsat6
आंध्र प्रदेश – गुरूवारी सतीश धवन अवकाश केंद्रावरून भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) जीसॅट ६ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. जीसॅट- ६ कडे भारताचा अत्याधुनिक दळणवळण उपग्रह म्हणून पाहिले जात होते. हा उपग्रह आकाशात भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरूवारी दुपारी ४.५२ मिनिटांनी सोडण्यात आला. जीसॅट मालिकेतील हा बारावा उपग्रह आहे. या उपग्रहाच्या सेवेचा लाभ एस बँड व सी बँड वापरकर्त्यांना होणार आहे. या उपग्रहाचे वजन २११७ किलो असून त्यात ११३२ किलो इंधने व ९८५ किलो वजनाच्या मूळ उपग्रहाचा समावेश आहे. या उपग्रहावर सर्वात मोठा एस बँड अँटेना असून त्याचा व्यास सहा मीटर आहे. काल ११.५२ वाजता या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची उलटगणती सुरू झाली होती.

Leave a Comment