बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी

rbi
नवी दिल्ली – बँक कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ काळापासूनची महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी मिळावी ही मागणी अखेर मान्य करण्यात आली असून त्यानुसार सप्टेंबर महिन्यापासून देशातील सर्व प्रकारच्या बँकांना हा सुट्टीचा नियम लागू राहणार असल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना महिन्यातील दोन आठवडे पाच दिवसांचा आठवडा या संकल्पनेचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भात केंद्रीय आर्थिक सेवा विभागाने अधिसूचना जारी केली.

रिझर्व्ह बँक कायदा, १९३४च्या दुसऱ्या परिशिष्टांतर्गत येणाऱ्या सर्व म्हणजेच सरकारी, सहकारी, खासगी, ग्रामीण प्रादेशिक बँकांतील कर्मचाऱ्यांना आता प्रत्येक महिन्यात दोन दिवस वाढीव सुट्टी मिळणार आहे. दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँका बंद असल्याने त्यांना वाढीव सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा या संकल्पनेचा किमान महिन्यातील दोन आठवडे तरी लाभ मिळणार आहे. वेतनवाढीसह दोन शनिवारच्या सुट्टीच्या मागणीबाबत ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’ने (एआयबीईए) इंडियन बँक्स असोसिएशनकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर हा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. मात्र, या निर्णयानुसार पहिल्या, दुसऱ्या व असेल तर पाचव्या शनिवारी बँका सुरू राहणार आहेत.

Leave a Comment