अनिर्बंध वृक्षतोडीमुळे वटवाघळांच्या प्रजातीला धोका

bats
लंडन – भारताच्या लोकसंख्येत वेगाने होणारी वाढ, त्यांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी जंगलांची कत्तल करून शेतजमिनीत होत असलेल्या बदलाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जंगलांमध्ये असलेल्या वटवाघळांच्या विविध प्रजातींचे आयुष्य धोक्यात आले असल्याची बाब ब्रिटनमध्ये झालेल्या एका ताज्या सर्वेक्षणात स्पष्ट झाली आहे.

चहा-कॉफी किंवा रबराच्या मळ्यांमध्ये जीवंत राहू शकणार्‍या वटवाघळांच्याच प्रजाती सुरक्षित असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. बंगळुरूची राष्ट्रीय जैवविज्ञान संस्था, म्हैसूरची पर्यावरण संवर्धन संस्था आणि ब्रिटनमधील लीड्‌स विद्यापीठाच्या अभ्यासकांनी संयुक्तपणे पश्‍चिम घाटातील वटवाघळांच्या प्रजातींचा आणि त्यांच्यापुढे असलेल्या आव्हानांचा अभ्यास केला.

भीषण वृक्षतोडीमुळे वटवाघळांची नैसर्गिक वसतिस्थाने नष्ट झाली असून अनेक दुर्मिळ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पश्‍चिम घाट प्रांतात जैवविविधता असणार्‍या एकूण आठ जागा असून त्यांचा अभ्यासात प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment