देशातला पहिला सोलर फार्मर रमण परमार

raman
शेती उत्पादनाबरोबरच वीज विक्री करून जादा उत्पादन मिळविणारा रमण परमार हा गुजराथेतील शेतकरी देशातील पहिला सोलर फार्मर बनला आहे. केंद्र सरकारने सौर उर्जेला प्रोत्साहन मिळावे यासाठी छोट्या व्यावसायिकांना तयार करण्याचे काम हाती घेतले आहे असाच प्रयत्न राज्य सरकारांकडूनही केला जात आहे. गुजराथ सरकारने धवल म्हणजे दूध क्रांतीनंतर आता ऑरेंज म्हणजे सोलर क्रांती हाती घेतली असून त्याची सुरवात आणंद जिल्ह्यापासूनच केली आहे. रमण हा याच जिल्ह्यातल्या धामणगांवचा शेतकरी असून त्याच्या शेतात प्रथम सौर पॅनलद्वारे वीज मिर्मिती केली गेली. रमणने चार महिन्यात ही वीज विकून त्यातून ७५०० रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

कृषी संशोधन संघ, आंतरराष्ट्रीय पाणी व्यंवस्थापन संस्था व टाटा यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे.यासाठी शेतकर्‍यांची यादी मागविण्यात आली होती त्यातून रमण यांचे नाव निवडले गेले असे समजते. रमण केळीची शेती करतात. त्यांच्या शेतात सौर पॅनल बसविली गेली तेव्हा त्यातून निर्माण झालेल्या वीजेतून त्यांना शेतीला पाणी देता आलेच पण वीजेबाबत ते स्वयंपूर्णही झाले. म्हणजे बाहेरच्या वीजेची ज्यांची गरज संपली. गरजेनुसार वापर केल्यानंतरही जादा राहिलेली वीज ग्रीडमध्ये साठवून सरकारलाच विकली गेली.

यामुळे वीज नाही म्हणून शेतीला पाणी देता येत नाही व परिणामी शेतीचे नुकसान होण्याची शक्यता संपुष्टात आली. शेतकरी या पद्धतीने शेतात सोलर पॅनल बसवून ५० ते ६० हजार रूपयांची कमाई वीज विक्रीतून करू शकतील असे तज्ञांचे मत आहे. म्हणजे पशुपालनाप्रमाणे शेतकर्‍यांसाठी सोलर वीज हा जोडधंदा बनू शकणार आहे.

1 thought on “देशातला पहिला सोलर फार्मर रमण परमार”

Leave a Comment