कार मेकर्ससाठी मेक्सिको बनतेय एक्स्पोर्ट मार्केट

mexico
मेक्सिको हा मध्य अमेरिकेतील देश भारतापासून दूर अंतरावर असला तरी भारतात उत्पादित केल्या जात असलेल्या कारसाठी हा देश यंदाच्या वर्षात सर्वात मोठे निर्यात मार्केट बनत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. भारतातून कारची जी निर्यात होते आहे त्यात २० टक्के वाटा मेक्सिकोचा आहे. आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिका हे भारतात उत्पादित कारसाठी सर्वात मोठे निर्यात मार्केट होते यंदा मात्र मेक्सिकोने आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. यामागे या देशात लेफ्ट हँड ड्राईव्ह कार चालतात हेही एक कारण आहे.

मेक्सिकोला निर्यात केल्या जात असलेल्या कारमध्ये २०१५-१६ सालात ५० टक्के वाढ नोंदविली गेली असल्याचे सांगितले जात आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात ही संख्या १.३२ लाख वाहनांवर जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे. गतवर्षी याच काळात ८२ हजार वाहने निर्यात केली गेली होती. फोक्सवॅगनने ५५ हजारांहून अधिक, जनरल मोटर्सच्या बीट स्मॉल कार ४५ हजारांहून अधिक कार निर्यात केल्या जात असून बीट तेथे स्पार्क नावाने विकली जाते. ह्युंदै आय १०, एक्सेंट, फोर्डची फिगो, आणि एस्पायर, मारूती सुझुकी सियाज मेक्सिको बाजारात लोकप्रिय होत आहेत. मेक्सिकोतील वाढती मागणी कार उत्पादकांसाठी चांगली संधी असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Leave a Comment