क्रिस्टीयानो अमेरिकेचा रहिवासी होणार?

ronaldo
पोर्तुगाली फुटबॉलपटू क्रिस्टीयानो रोनाल्डो याने न्यूयॉर्कच्या पॉश वस्तीत १८.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ११७ कोटी रूपये खर्च करून घरखरेदी केली आहे. यामुळे रोनाल्डो अमेरिकेचा रहिवासी होणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. न्यूयॉर्कच्या पाचव्या अॅन्वेन्यूतील ट्रंप टॉवरमध्ये रोनाल्डोने अडीच हजार चौरस फुटाचे हे घर खरेदी केले आहे.

रोनाल्डोचा बहुतेक वेळ सध्या युरोपात व्यतीत होतो आहे कारण तो तेथे रियल माद्रिद आणि पोर्तुगाल नॅशनल टीमकडून खेळतो आहे. २०१६ ला त्याचा माद्रिदबरोबरचा करार संपतो आहे. त्यामुळे तो आता अमेरिकेत राहायला जाईल आणि युरोप ऐवजी यूएस लीग खेळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ३० वर्षीय रोनाल्डो गेले काही दिवस मनमुराद पैसे खर्च करतो आहे आणि तीही बातमी झाली आहे. रोनाल्डोने त्याचा एजंट मेंडेसला लग्नाचा आहेर म्हणून चक्क बेट भेट म्हणून दिले आहे.

Leave a Comment