लोबार्गिनीची नवी एसव्ही रोडस्टार सादर

lamborgini
लोबार्गिनीने त्यांची २०१६ची नवी कार अव्हेंटेडोर सीपी ७५० सुपरवेलॉस रोडस्टर सादर केली असून कंपनीची ही सुपरवेलॉस एम्ब्लेम असलेली पहिलीच कन्व्हर्टिबल कार आहे. २०१५ च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये कंपनीने अव्हेंटेडोर सुपरवेलॉस कूपे सादर केली होती. रोडस्टर त्याच प्रकारची कार आहे.

सुपरवेलॉस कूपेप्रमाणेच या गाडीची बॉडीही कार्बन फायबर पासून बनविली गेली आहे मात्र कार अधिक वेगवान बनविण्यासाठी त्यात कांही बदल केले गेले आहेत. ६.५ लिटर व्ही १२ इंजिन कारला दिले गेले असून कारचे वजन आहे १५०० किलो. ही कार १ ते १०० किमीचा वेग अवघ्या २.९ सेकंदात घेते आणि तिचा टॉपस्पीड आहे ३५० किमी. कंपनी या मॉडेलच्या फक्त ५०० कार बनविणार आहे.

Leave a Comment