पाणी स्वच्छ आणि शुध्द करणारे ड्रिंकेबल बुक

drink
अमेरिकेतील पिटसबर्ग विद्यापीठातील संशोधक डॉ. टेरी दानकोविच यांनी पाणी शुद्ध करणारे ड्रिंकेबल बुक तयार केले असून विकसनशील देशांतील नागरिकांना पिण्याचे पाणी स्वस्तात आणि शुद्ध स्वरूपात मिळावे यासाठी हा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे. डॉ. टेरींनी हे पुस्तक तयार करण्यासाठी अनेक वर्षे संशोधन, प्रयोग आणि चाचण्या केल्या आहेत आणि आता चाचण्या यशस्वी झाल्यनंतर हे बुक सादर केले आहे.

नद्या, सरोवरे, तलाव, विहीरी असे कुठल्याही ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी या पुस्तकातील पाने वापरता येणार आहेत. १ पान १०० लिटर पाणी शुद्ध करू शकते. हे पान फिल्टर अथवा नरसाळ्यात घालून त्यावरून पाणी गाळायचे इतकेच त्यासाठी करायचे आहे. या पानात चांदी आणि तांबे यांचे अतिसूक्ष्म कण आहेत. त्यातून पाणी गाळल्यानंतर पाण्यातील बॅक्टेरियाही मरतात असा टेरी यांचा दावा आहे. दक्षिण आफ्रिका, घाना, बांग्लादेशातील विविध ठिकाणच्या २५ पाणी नमुन्यांची चाचणी या पानांवर केली असता हे पाणी ९९ टक्के शुद्ध झाल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment