
मुंबई: टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जबरदस्त ऑफर्सची स्पर्धा लागली असून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तरुणांना आकर्षित करण्यासाठी आपल्या यूजर्ससाठी कंपनीने विशेष ऑफर्स दिल्या आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने टेलिकॉम कंपन्यांकडून जबरदस्त ऑफर
स्वातंत्र्यदिनी बीएसएनएल आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी नव्या ऑफर देत असून विशेष म्हणजे या ऑफर्समध्ये सर्वात महत्त्वाचा आहे त्या डेटा पॅकच्या ऑफर्स. ज्यात कंपनी यूजर्सला १० टक्के एक्स्ट्रा डेटा ऑफर देत आहे ही ऑफर १४ ते १७ ऑगस्टपर्यंत आहे. म्हणजे जर आपण ९८ रुपयांचे रिचार्ज केले तर त्यात आपल्याला १.१ जीबी २जी डेटा मिळतो आणि याची व्हॅलिडिटी २८ दिवसांपर्यंत राहते. पण स्वातंत्र्यदिनानिमित्त असलेल्या ऑफरमध्ये आपल्याला कंपनी याच किमतीत १.२१ जीबी डेटा मिळेल. सोबतच एक्स्ट्रा व्हॅलिडिटी सुद्धा मिळेल. म्हणजे आपण ५जीबी २जी डेटा रिचार्ज करत असाल तर कंपनी आपल्याला ३० दिवसांची व्हॅलिडिटी देत असते. पण स्वातंत्र्यदिनानिमित्त असलेल्या ऑफर अंतर्गत कंपनी आपल्याला याच किमतीत ६० दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येईल.
आपल्या ग्राहकांना वोडाफोनने डबल डेटाची ऑफर दिली आहे. या अंतर्गत यूजर्स डेटा पॅक घेत असतील. तर त्यांना तेव्हढाच डेटा फ्री दिला जाईल. कंपनीची ही ऑफर ३० ऑक्टोबरपर्यंत व्हॅलिड आहे. २जी, ३जी यूजर्स कंपनीच्या या ऑफरचा फायदा घेऊ शकतील. जर यूजर १GB डेटाचे रिचार्ज करत असेल तर यूजरला डबल डेटा ऑफर अंतर्गत त्याच किमतीत २जीबीचा डेटा मिळेल.
