
मुंबई – डूबते को तिनके सहारा अशा म्हणीचा अनुभव केंद्र सरकारला नुकताच आला असून नेहमी विकास कामासाठी निधी नसल्याची ओरड करणाऱ्या केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून तब्बल ६६ हजार कोटी रुपये लाभांश म्हणून मिळाले आहेत. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक जेव्हापासून स्थापन झाली तेव्हापासून आज म्हणजे गेल्या ८० वर्षात केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात लाभांश मिळाला आहे. एखादी कंपनी ज्या प्रमाणे आपल्या शेअरधारकांना लाभांश देते त्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेत केंद्र सरकारचे काही प्रमाणात हिस्सा असल्यामुळे हा लाभांश सरकारला मिळाला आहे.
इतिहासात प्रथमच केंद्र सरकारला ६६ हजार कोटींचा लाभांश!
केंद्राला आर्थिक आघाडीवर आरबीआयकडून मिळालेल्या या लाभांशामुळे मोठा दिलासा मिळणार असून केंद्र सरकारला अनपेक्षितपणे मिळालेल्या धनलाभामुळे वित्तीय तूटीचे लक्ष्य पूर्ण करण्यास मदत होऊ शकते. यामुळे केंद्र सरकार बाजारपेठेत वित्तीय पुरवठा वाढवू शकतो त्याचा परिणाम आर्थिक विकासाची चक्रे वेगाने फिरण्यास मदत होऊ शकते.
