स्वस्त झाला मायक्रोमॅक्सचा युरेका प्लस

yureka
मुंबई: युरेका प्लस या आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत मायक्रोमॅक्सने चांगलीच कपात केली असून ज्यावेळी हा स्मार्टफोन लाँच झाला त्यावेळी याची किंमत ९,९९९ रु. होती. आता यामध्ये १००० रुपयांची कपात घट करण्यात आली असून आता हा स्मार्टफोन रु. ८,९९९ किंमतीला उपलब्ध असणार आहे.

याबाबतची घोषणा कंपनीने आपल्या आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकांउटवरुन केली. याची नवी किंमत अमेझॉन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरही अपडेट झाली आहे. आपली स्पर्धक कंपनी लेनोव्होच्या के ३ नोटला टक्कर देण्यासाठी युरेकाची किंमत कमी करण्यात आला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

युरेका प्लसची पहिली विक्री अमेझॉन इंडियावर गुरुवारपासून होणार असून यासाठी अमेझॉनवर नोंदणीही सुरु झाली आहे. मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंतच ही नोंदणी करता येणार आहे.

Leave a Comment