आयआयएमचा निर्णय; एकाच दिवशी होणार कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट

cat
नवी दिल्ली : आयआयएमने देशातील प्रमुख मॅनेजमेंट टेस्टसशी संबंधित कॅट पॅटर्नमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून, या बदलानुसार आता देशात एकाचवेळी म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट घेण्यात येणार आहे. या अगोदर दोन टप्प्यांत ही परीक्षा घेण्यात येत होती. दोन टप्प्यांत घेण्यात आलेल्या परीक्षेचे गुण १९ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला अर्थात एमआयएमला लागू होतो. या क्षेत्रातील तज्ज्ञ राहुल गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार यावेळी होणारा बदल विद्याथ्र्यांसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. कॅट परीक्षेसाठी ६ ऑगस्टपासून रजिस्ट्रेशन सुरू होतील आणि २० सप्टेंबर रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख असेल. त्यानंतर ऑनलाईन अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची सुविधआ १५ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि या परीक्षेचा निकाल जानेवारीच्या दुस-या आठवड्यात लागेल.

कॅटच्या परीक्षेत बरीच नवी नियमावली स्वीकारली असून, या पुढे आता या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. या टेस्टमध्ये तीन सेक्शन असतील. त्यामध्ये क्वांटेटिव्ह अ‍ॅप्टीट्यूट, डाटा एंटरप्रिटेशन अ‍ॅण्ड लॉजिकल रिजनिंग, व्हर्बल अ‍ॅण्ड रिडिंग कॉम्प्रेहेन्शनचा समावेश असेल. क्वॉटेट्विह अ‍ॅप्टीट्यूटमधून ३४, टाडा एंटरप्रिटेशन अ‍ॅण्ड लॉजिकल रिजनिंगमधून ३२, व्हर्बल अ‍ॅण्ड रिडिंग कॉम्प्रेहेन्शनमधून ३४ प्रश्न असतील. परीक्षार्थीना प्रत्येक सेक्शनसाठी ६० मिनिटे मिळतील. ६० मिनिटांच्या एका टेस्टदरम्यान एका सेक्शनमधून दुस-या सेक्शनमध्ये जाता येणार नाही. नॉन एमसीक्यू प्रश्नही इंट्रोड्यूस केले असून परीक्षाथ्र्यांना स्क्रीनवर उत्तरे टाईप करावी लागतील, असेही यासंदर्भात स्पष्ट करण्यात आले. या नव्या नियमावलीमुळे परीक्षेत सुसूत्रता येण्यास मदत होणार असून, विद्याथ्र्यांसाठीदेखील ही पद्धती सोयीची असेल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

Leave a Comment