मोटोरोलाने लाँच केला बहुप्रतिक्षित मोटो जी३

moto-g3
नवी दिल्ली – आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात मोटोरोलाचा बहुप्रतिक्षित मोटो जी३ लाँच करण्यात आला. आधीच्या दोन्ही मोटो जी प्रमाणेच अपेक्षेप्रमाणेच हा फोनही बजेट फोन असून मोटोरोलाचा मोटो जी हा चांगले फीचर्स आणि तुलनेने स्वस्त असल्यामुळे अल्पावधीतच एक लोकप्रिय स्मार्टफोन म्हणून ओळखला गेल्यामुळेच मोटो जी आणि मोटो जी३ वरही गॅझेटप्रेमींच्या उड्या पडल्या होत्या. हा स्मार्टफोन लाँचिंगपूर्वी मोटो जी३ किंवा मोटो थर्ड जनरेशन किंवा मोटो जी २०१५ अशा अनेक नावांनी ओळखला जात होता. या नव्या अपडेट स्मार्टफोनची किंमत सर्वासामान्यांच्या आवाक्यातीलच आहे. आज मध्यरात्रीपासून फ्लिपकार्टवर मोटो जी३ विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

कालच इंटरनेटवर मोटो जी३ ची स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स लीक झाली होती. या स्मार्टफोनचा स्क्रीन ५ इंच एचडी असून, त्याला कोर्निंग गोरिला ग्लासला ३चे संरक्षक कवच आहे. मोटो जी३ ची ओएस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम अँड्राईड ५.१.१ लॉलीपॉप आहे. मोटोरोलाची खास अशी समजली जाणारी मोटो डिस्प्ले, क्वीक कॅप्चर, चॉप ट्वाईस ने हा स्मार्टफोन सज्ज आहे.

Leave a Comment