लाव्हाचा नवाकोरा पिक्सेल व्ही १ स्मार्टफोन लाँच

lava
नवी दिल्ली- गुगलच्या साथीने पहिलावहिला अँड्रोईड वन स्मार्टफोन लावाने भारतात लाँच केला असून कमी किंमतीचा आकर्षक असा ‘पिक्सेल व्ही १’ हा स्मार्टफोन आहे. ‘पिक्सेल व्ही १’ या स्मार्टफोनची किंमत ११ हजार ३५० रुपये आहे.

फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवर सोमवारपासून ‘पिक्सेल व्ही १’ स्मार्टफोनची विक्री सुरू करण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सेल तर फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सल असल्यामुळे सेल्फीप्रेंमीसाठी हा स्मार्टफोन पर्वणी ठरणार आहे.

‘पिक्सेल व्ही १’चे फिचर्स?
» पाच इंच डिस्प्ले » ७२०X१२८० पिक्सेल स्क्रिन रेझ्योल्यूशन » १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅश » आठ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » दोन जीबी रॅम » ३२ जीबी इंटरनल मेमरी » २६५० एमएएच बॅटरी » १.३ गिगाहर्टझ क्वालमन मिडियाटेक प्रोसेसर » अँड्रॉईड ५.१.१ लॉलीपॉप

Leave a Comment