सॅमसंगचा गॅलेक्सी ए ९.७ टॅब्लेट लॉन्च

samsung
नवी दिल्ली: कोणताही गाजावाजा न करता सॅमसंगने आपला नवा गॅलेक्सी टॅब्लेट बाजारात आणला असून आपल्या संकेतस्थळावर गॅलेक्सी टॅब ए ९.७
लॉन्च केला आहे. हा टॅब ऑनलाईन, तसेच रिटेल स्टोअरमधूनही युजर्स खरेदी करु शकतात. या टॅबची किंमत २३ हजार ७५० रुपये एवढी आहे.
सॅमसंगच्या या नव्या टॅबमध्ये युजर्सना ऑनड्राईव्हवर दोन वर्षांसाठी १००जीबीचा मोफत स्टोरेज मिळणार आहे. यासोबत स्टायलिश पेनही मिळेल.

काय आहेत गॅलेक्सी ए ९.७ टॅबचे फीचर्स :
या टॅबचा डिस्प्ले ९.७ इंचाच असून रिझुव्ह्लेशन १०२४X७६८ पिक्सेलचे आहे. याचे ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ५.० लॉलिपॉपवर आधारित आहे. प्रोसेसर १.२ GHz क्वाड कोर, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, एसडीद्वारे १२८ जीबी एक्सांडेबल मेमरी आहे. या टॅबचा रेअर कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा तर फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे.

Leave a Comment