सेबीचा काळापैसा साठवणाऱ्या ९०० कंपन्यांना दणका

sebi
नवी दिल्ली: सेबीने काळा पैसा पांढरा करण्यासाठी शेअर बाजारातल्या गुंतवणूकीचा आधार घेऊ पाहणाऱ्या ९०० कंपन्यांवर बंदी घातली. याविषयीची माहिती सेबीचे प्रमुख यू. के. सिन्हा यांनी वृत्त संस्थेला दिली आहे.

सेबीने या कंपन्यांनी करापोटी ५ ते ६ हजार कोटी रुपये बुडवल्याचा संशयही व्यक्त केला आहे. केंद्रीय प्रत्यक्षकर विभागाला या ९०० कंपन्यांची यादी देण्यात आली आहे. करचुकवेगिरीप्रकरणी या कंपन्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याची शिफारसही सेबीने केली आहे.

Leave a Comment