
दिल्ली – केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने यंदाच्या आर्थिक वर्षात किमान १ कोटी नवीन करदात्यांना आयकर विभागाच्या जाळ्यात आणण्याचे दिलेले लक्ष्य पुरे करण्यासाठी आयकर विभागाने जोरदार मोहिम हाती घेतली असून त्यात पुणे विभागाला सर्वाधिक म्हणजे १०.१४ लाख नवीन करदाते नोंदवायचे आहेत.
यावर्षात १ कोटी लोकांना कराच्या जाळ्यात आणणार
मिळालेल्या माहितीनुसार सरकारचा कर आधार अधिक व्यापक करण्यासाठी आयकर विभागाच्या सर्व क्षेत्रीय फॉर्मेशनना सक्रीय केले गेले आहे. त्यात पुणे आयकर विभागाला १०.१४ लाख नवीन करदात्यांचे लक्ष्य दिले गेले आहे. उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल, पंजाब, हरियाणा यांना साडेनऊ लाख नवीन आयकरदाते कराच्या जाळ्यात आणायचे आहेत तर आंध्र, तेलंगाणासाठी हेच लक्ष्य ७.९३ लाखांचे आहे. गुजराथेत ७.८६, तमीळनाडू ७.६४, प.बंगाल, सिक्कीम ६.९१ तर मुंबईसाठी ६.२३ लाख आयकरदाते असा आकडा दिला गेला आहे.
