चलनी नोटांवर लवकरच झळकणार देशातील आठ ऐतिहासिक स्थळे !

rbi
हैदराबाद – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारतीय चलनावर देशातील आठ ऐतिहासिक ठिकाणांच्या स्मारकांचे चित्र छापण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता १० रुपयांच्या नवीन नोटांवर आठ ऐतिहासिक स्मारकांचे छायाचित्र दिसून येणार आहेत. त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक बैठक घेतल्याची माहिती आहे.

भारतीय पुरातत्व विभागाशी केंद्रीय अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी याबाबत चर्चा केली असून तसेच या निवडक आठ ऐतिहासिक ठिकाणांची छायाचित्रे जमा करण्याचे आदेशही संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता १० रुपयांच्या नोटांवर हम्पीतील ‘विजयनगर दगडी रथा’चे छायाचित्र असणार आहे. तर चलनातील २० रुपयांच्या नोटांवर दिल्लीचा ‘लाल किल्ला’ असणार आहे. ५० रुपयांच्या नोटांवर कोणार्कचे ‘सूर्यमंदिर’ तर १०० रुपयांच्या चलनी नोटांवर आग्र्याचा ‘ताजमहाल’ छापण्यात येणार आहे. तसेच ५०० रुपयांच्या नोटांवर गोव्यातील ‘चर्च आणि कॉन्वेंट’ तर भारताचे सर्वात मोठे चलन असणाऱ्या १००० रुपयांच्या नोटांवर महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू औरंगाबादेतील अजिंठा गुहा लेणी आणि अजिंठा गुहेतील पद्मावती छायाचित्रला मान मिळाला आहे.

Leave a Comment