नासाचा नीअर अर्थ ऑब्जेक्ट प्रकल्प

earth-near-object
न्यूयॉर्क : हानिकारक अशा लघुग्रहांपासून पृथ्वीला असलेला धोका टाळण्यासाठी प्रसंगी अण्वस्त्रे वापरण्याची तयारी अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने ठेवल्याचे समजते. नीअर अर्थ ऑब्जेक्ट म्हणजे पृथ्वीजवळचे पदार्थ शोधून काढण्याचा एक प्रकल्प आहे, त्यात पृथ्वीवर आदळू शकतील अशा लघुग्रहांचा माग आधीच काढला जात असतो, त्यामुळे असा लघुग्रह किंवा अवकाशातील एखादा धूमकेतू पृथ्वीवर आदळण्याची शक्यता दिसली तर त्याच्यावर अण्वस्त्रे सोडून त्याचे तुकडे केले जातील.

अमेरिकेच्या नासा या संस्थेने पृथ्वीजवळ येणा-या लघुग्रहांचा नाश करण्यासाठी राष्ट्रीय अणु सुरक्षा प्रशासनाशी करार केला आहे, त्यामुळे धूमकेतू किंवा लघुग्रह यांची दिशा बदलता येईल किंवा त्यांचे तुकडेही करता येतील, असे लघुग्रह किंवा धूमकेतू पृथ्वीवर आदळल्यास येथील शहरांना धोका आहे. शिवाय संपूर्ण ग्रहावरील जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते. धोकादायक अंतराळ कचरा नष्ट करण्यासाठी सर्वेक्षण केले आहे, त्यासाठी अग्निबाण छेदक तयार केले असून जर अण्वस्त्राचा स्फोट केला, तर लघुग्रहाचे तुकडे होऊ शकतील किंवा त्याची दिशा बदलता येईल याचे सदृश्यीकरण महासंगणकावर केले आहे, असे न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त आहे.

Leave a Comment